राजकारण

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भुजबळांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत असून तातडीने त्यांना येवल्याहून नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भुजबळांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत असून तातडीने त्यांना येवल्याहून नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना नुकतेच देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज सकाळी वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले असून त्यानंतर पुढील उपचार सुरू होणार आहे. सध्या त्यांच्यावर भुजबळ फार्म येथील राहत्या घरीच उपचार सुरू आहेत.

दरम्यान, वीर सावकरांबाबत राहुल गांधींच्या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. उद्धव यांचे बोलणे चुकीचे नाही, महाशक्ती विरोधात लढताना छोट्या गोष्टी टाळल्या, तर मोठा जनसमुदाय आपल्यासोबत येऊ शकतो. एकत्र लढूया, लोकशाही अस्ताला जात असल्याने देशभरात लढू, राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीचे आहे, असे त्यांनी म्हंटले होते.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी