राजकारण

पंढरपूरमधील राष्ट्रवादीचा बडा नेता बीआरएसमध्ये करणार प्रवेश

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत. यावेळी हा पक्षप्रवेश होणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिराज उबले | पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके बीएसआर पक्षात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांच्या बैठकीत नंतर भालके यांनी ही माहिती दिली. भालकेंच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

मागील काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. आज भालके यांनी अधिकृत बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले. 27 जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत. या दरम्यान सकाळी सरकोली येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत.

भरपावसात फडणवीसांची सभा LIVE: पावसात भिजलो की सीट निवडून येते: फडणवीस

Ravindra Dhangekar Kasaba Peth Assembly constituency: रवींद्र धंगेकर कसबा पेठ मतदारसंघासाठी सज्ज

Latest Marathi News Updates live: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड

Dilip Mohite Patil Khed Aalandi Assembly constituency: दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड आळंदी मतदारसंघात विकासाची नवी दिशा

शरद पवार यांचं भरपावसात जोरदार भाषण, पुन्हा करिष्मा घडणार का?