राज्यात अनेक विषयावरून राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशातच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरच आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
शिवसेना वाचवायची तर तुम्हाला काम करावं लागेल, असं मी म्हटलं होतं. महाविकास आघाडीमध्ये एकटा जीव आणि सदाशीव आहे. सकाळी सात वाजतापासून रात्री दहा वाजतापर्यंत सुरू असायचं, असं विधान अब्दुल सत्तार काल म्हणाले.
काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही
अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना वेगळं बोलत होते. मग सेनेत गेले तेव्हा वेगळं बोलायचे. ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. त्यामुळं त्यांच्या विधानांना आम्ही महत्त्व देत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.