राजकारण

'पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात... काय बोलावं...'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी बुधवारी शिर्डीला गेले असताना अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार म्हणाले की, आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला त्यावर बोलताना अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, अचानक त्यांचा ताफा सिन्नरच्या मिरगावच्या शिवारात अचानक वळल्याने एकच धावपळ सुरू झाली. तिथे श्री क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी महादेवाची सपत्नीक पूजा केली. नाशिक शहरातील एक बड्या सुप्रसिद्ध राजकीय ज्योतिषी बाबाचे हे मंदिर आहे. त्याच्याकडून यापूर्वीच भविष्य जाणून घेतल्याची चर्चा असून त्याविषयी तोडगा काढण्यासाठी पूजा केल्याची चर्चा परिसरात आहे. सत्ता बदल होण्यापूर्वी त्यांनी याच पद्धतीने अचानक हेलिकॉप्टरने जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील एका मंदिरात याच पद्धतीने दर्शन घेतले होते आणि तेथील पुजाऱ्याकडून आपले भविष्य जाणून घेतले होते. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि नियोजित बैठका असताना त्यांनी अचानक मुहूर्त साधत शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाआड हा उपक्रम केल्याची शासकीय अधिकाऱ्यांमध्ये कुजबूज आहे

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने