उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडली. बीड येथील उत्तर सभेत छगन भुजबळ बोलत असताना खाली बसलेल्या नागरिकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.
छगन भुजबळ भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली. यावेळी खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बीडकरांना सलाम असं म्हटलं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं... त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.#Armstrong" असे म्हणत आव्हाडांनी ट्विट केलं आहे.