राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. महापुरुषांबाबत बेजबाबदार वक्तव्य होत असताना खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेली भूमिका ही चांगलीच आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे. त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असा टोला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
काय म्हणाले शरद पवार?
माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, गेले काही दिवसांपासून सातत्याने महापुरुषाबाबत बेजबाबदार वक्तव्य होत आहेत. याबाबत खुद्द भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, तरीही कोणतीही कार्यवाही झाली नाही. खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेली भूमिका ही चांगलीच आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असा टोला त्यांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे कालचे स्टेटमेंट ऐकले, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे. त्याचा योग्य तो निर्णय होईल. त्यामुळे मोर्चाला परवानगी मिळाली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एकच आहे की या मोर्चा संदर्भात लोकांमध्ये औत्सुक्य आहे. महापुरुषांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये राग आहे. विशेषता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जी जबाबदार व्यक्तीने केलेली विधाने सामान्य माणसांना अस्वस्थ करणारे आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या, भविष्यात दिसेल असा मला विश्वास आहे. असे पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.