Bacchu Kadu Vs Ravi Rana in Shinde-Fadnavis Goverment Team Lokshahi
राजकारण

'बच्चू कडूंनी शिंदे फडणवीसांना सोडचिठ्ठी द्वावी' राष्ट्रवादीचा सल्ला

कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. तर, केलेले आरोप सिद्ध करू शकला नाहीत तर कायदेशीर नोटीस पाठवू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.

Published by : Vikrant Shinde

चंद्रशेखर भांगे, पुणे

सध्या राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळतंय. कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. तर, केलेले आरोप सिद्ध करू शकला नाहीत तर कायदेशी नोटीस पाठवू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय. दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारमधील या अंतर्गत वादासंदर्भात आता सर्व राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी या विषयात आपली भुमिका मांडली आहे.

काय म्हणाले रविकांत वरपे?

"बच्चू कडू यांनी लबाडांच्या नादी न लागता त्यांची महाराष्ट्रात असलेली सकारात्मक प्रतिमा आणि विश्वास पुन्हा ते जनतेत निर्माण करून वाढवू शकतात. त्यांनी वेळीच शिंदे-फडणवीस सरकारला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. बच्चू कडू यांना समाजकारणात मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी हा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राची जनता त्यांना डोक्यावर घेईल."

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी