नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची शनिवारी (1 एप्रिल) पटियाला तुरुंगातून सुटका होणार आहे. सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित प्राधिकरणाने शेअर केलेल्या माहितीच्या आधारे सिद्धू यांनी ही माहिती पोस्ट केली आहे. 1990 च्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर ते 20 मे 2022 पासून पटियाला जेलमध्ये बंद आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांना १९ मे २०२२ रोजी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानुसार त्यांना 18 मे पर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. मात्र, कारागृहाच्या नियमानुसार कैद्यांना दर महिन्याला 4 दिवसांची रजा दिली जाते. शिक्षेदरम्यान सिद्धूने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. यामुळे मार्चअखेर 48 दिवस आधी त्याची शिक्षा पूर्ण होणार आहे. मात्र, पंजाब सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या कैद्यांच्या सुटकेसाठी बैठकांची फेरी सुरू आहे
दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबच्या राजकारणात चर्चेतील नाव आहे. भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे सिद्धू काँग्रेसमध्येही दमदार इनिंग खेळत आहेत. भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. भाजपकडून तीनदा लोकसभा निवडणूक लढवली होती.