राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच नुकताच शिक्षकआणि पदवीधर निवडणुका पार पडल्या. तर याच निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधले होते. या अटीतटीच्या सामन्यात सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी लढत झाली. दोन्ही उमेदवार अपक्ष लढत होते. पण शुभांगी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. याच निवडणुकीनंतर आता शुभांगी पाटील यांनी आज शिवसेनेच्या ठाकरेगटात प्रवेश केला. मातोश्रीवर जात त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. ज्यांनी-ज्यांनी या निवडणुकीत मदत केली त्या साऱ्यांचे शुभांगी पाटील यांनी या पक्षप्रवेशानंतर आभार मानलेत.
काय म्हणाल्या शुभांगी पाटील?
आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, आज मला उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिला आणि मिळालेल्या मतदानावरून कौतुक केले. एका सर्व सामन्य महिलेले इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी जनतेला सांगते की मी हारली नाही तुम्ही पण हार मानू नका. असे त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, आज मी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मी तुमच्या मार्फत सांगितले होते. मी शब्दाला पक्की आहे. त्यामुळे आज मी प्रवेश केला आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत लढत राहील आणि कायम त्यांच्यासोबत राहील. या निवडणुकीत मला ज्यांनी ज्यांनी मदत केली. मी त्यांचे आभार मानते. आमच्या सोबत असलेल्या सर्वच पक्षाचे आभार मानते. असे भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.