Satyajeet Tambe | Shubhangi Patil Team Lokshahi
राजकारण

नाशिक पदवीधर मतदारसंघ : सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात रंगणार सामना

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा मतसंग्राम सुरू झाला आहे. अर्ज माघारीची मुदत आता संपली असून निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाचा मतसंग्राम सुरू झाला आहे. अर्ज माघारीची मुदत आता संपली असून निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. नाशिकमधून रिंगणात 16 उमेदवार असले तरी फक्त दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात सामना रंगणार आहे.

पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेला हा मतदारसंघ काबिज करण्यासाठी २२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत यंदा मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित यांना अपक्ष रिंगणात उतरविले. तर, पदवीधर निवडणुकीतून डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल खाडे, दादासाहेब हिरामण पवार आणि भाजपकडून इच्छुक असलेले धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करण्याचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर शेवटच्या क्षणी राजेंद्र निकम, धनराज विसपुते यांनीही माघार घेतली.

धनराज विसपुते हे गेल्या 30 वर्षांपासून भाजपचे पदाधिकारी आहेत. विसपुते यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. पदवीधर निवडणुकीत भाजपकडून पाठिंबा मिळावा यासाठी भेट घेतली होती. परंतु, अखेर त्यांनी अर्ज माघारी घेतला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेकडून पाठिंबा घेतला होता आणि निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं त्यांनी विधान केलं होतं. परंतु, शुभांगी पाटील या आता नॉट रिचेबल आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद

Matheran | कड्यावरच्या गणपती परिसरात बिबट्याचा वावर ; व्हायरल फोटोने खळबळ