मुंबई : प्रगती घरी बसल्याने होत नाही आणि वैयक्तीक फायद्यामुळे केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेले असल्याची टीका लघु व सूक्ष्म उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरचा 94 वा वार्षिक सर्व साधारण सभेत नारायण राणे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
नारायण राणे म्हणाले की, मी देशाचा मंत्री असतो तरी मी महाराष्ट्राच्या बाजूने आहे. विरोधकांना टीका करण्याशिवाय कामधंदा नाही. अडीच वर्ष मातोश्रीत राहून त्यांनी सरकार चालवले. सर्व तडजोडी केलेल्या आहेत. आणि वैयक्तीक फायद्यामुळे केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेलेले आहेत, असा थेट आरोप त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे.
शरद पवारांची आघाडीची राजवट होती. त्यांच्यामध्ये उद्योगांना पोषक वातावरण नव्हते. म्हणून उद्योग गेले. यामुळे आता का करत बसू नये. राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला आम्ही समर्थ आहोत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मीही महाराष्ट्रचा उद्योग मंत्री होतो. उद्योग येताना अनेक गोष्टी असतात. जमीन, टॅक्स अशा अनेक मागण्या उद्योजकांच्या असतात. लोक फक्त घरी बसतात. प्रगती घरी बसल्याने होत नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.