राजकारण

आव्हाडांच्या 'त्या' विधानावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ते सध्या...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राम मांसाहारी असल्याचा दावा शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाडांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीही प्रतिक्रिया समोर येत आहे. आव्हाड आणि मातोश्री बद्दल काही बोलायचे नाही, ते सध्या घसरलेत, असा निशाणा राणेंनी साधला आहे.

नारायण राणे म्हणाले की, आव्हाड आणि मातोश्रीबद्दल काही बोलायचे नाही. ते सध्या घसरलेत. सत्ता गेल्याने ते डिप्रेशनमध्ये आहेत. आमच्या देवतांवर त्यांनी बोलायचे धाडस करू नये. मग त्यांना शेवटी आराम करावा लागेल.

तर, राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवार यांनी म्हंटले की, आपल्या विचारांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर ईडीचा वापर करून दबाव आणला जातोय. यावर नारायण राणे म्हणाले की, मला पवार साहेब काय बोलले ते माहित नाही. ते जेष्ठ नेते आहेत. ते काय बोलले ते मी खात्री करेन.

अनिल देशमुख हा काय साधुसंत नव्हता. महिन्याला पैसे मागत होता, त्याचे पुरावे मिळालेत. पवार साहेबांना वाईट वाटायची गरज काय? ते दिल्लीत असताना काही बोलायाचे नाहीत. आम्ही विरोधक म्हणून पाहत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महानंद प्रकल्पाबाबत संजय राऊत यांनी आरोप केला. त्यावरुनही नारायण राणेंनी राऊतांनवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत पागल झाला आहे. सहा महिने महानंदच्या कामगारांना पगार नाही, मी याबाबत आता प्रस्ताव ठेवलाय की, एनडीबीने महानंद चालवायला घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार