सिंधुदुर्ग : आदित्य ठाकरे यांनी 31 डिसेंबर रोजी सरकार पडणार म्हणजे पडणारच, असा दावा केला आहे. यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कसे पडणार? आदित्य ठाकरे बैठकांना नसणार, जेलमध्ये असेल. संजय राऊतही असेल, असे विधान नारायण राणेंनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नारायण राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे कोण आहे? त्याला काही नाही, आता खळा बैठका घेत आहेत. त्यांचे १६ चे १६० करणार, ही काय जादूची कांडी आहे काय? सरकार कसे पडणार?आदित्य ठाकरे बैठकांना नसणार, जेलमध्ये असेल. संजय राऊतही असेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
सत्ता असताना काय केले? खोके बिके बोलतात ना त्यांनी आमच्या समोर बोलू नयेत. मातोश्रीवरील सर्व माहिती आहे. १६ सुद्धा राखता येणार नाहीत. मी ज्योतिषी नाही. पण, ५ राज्यात निवडणुका आहेत, त्यात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. याचे नियोजन नौदल आणि राज्य सरकार यांच्याकडे आहे. मोदी दौरा आहे, पण २४ तारखेला एक दौरा झाला त्याचा फायदा काय झालं, असा निशाणा नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर साधला आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत आहेत म्हणजे काही पाहिजेच असे नाही. पर्यटन हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात आहे. पर्यटन आधारित उद्योग, एमएसएमई देणार आहे. ओरोस येथे १६ कोटींची जागा एमएसएई प्रोजेक्टसाठी दिली आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.