Uddhav Thackeray - Narayan Rane Team Lokshahi
राजकारण

‘सुपारी’वरुन राणे शिवसेनेत जुंपली, करणार भांडाफोड

कुणी कुणाला संपवायच्या ‘सुपाऱ्या’ घेतल्या दोघेही करणार भांडाफोड

Published by : Shubham Tate

narayan rane udhhav thackeray : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना संपवण्याची योजना आखल्याचा दावा भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी केला. तथाकथित शांत आणि सभ्य शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हत्येसाठी अनेक सुपाऱ्या दिल्याचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. (narayan rane nitesh rane tweets betel nut many times eliminate father shivsena udhhav thackeray)

नितेश राणे यांनी ट्विट करून लिहिले, "एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे माझ्या वडिलांनाही तथाकथित शांत आणि सभ्य सेनाप्रमुखांनी शिवसेना सोडल्यानंतर माझ्या वडिलांना संपवण्यासाठी अनेक "सुपाऱ्या" दिल्या.

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्धव ठाकरेंवर सतत हल्लाबोल करत होते. केंद्राच्या योजनांची मोजदाद करण्याऐवजी राज्य सरकारच्या उणिवा मोजण्यावर राणेंचा भर राहिला. जनआशीर्वाद यात्रेदरम्यानच्या जाहीर सभेत राणे उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले होते की, 'आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना कळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भाषण चालू असताना त्यांनी मागे वळून पाहिलं आणि सहकाऱ्याला विचारलं. मी तिथे असतो तर मी त्याला जोरात मारले असते. त्यांच्या वक्तव्याबाबत महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणेंसह नारायण राणेंवर वैभव नाईक यांनी निशाणा साधला आहे. सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. असे वैभव नाईक म्हणाले. श्रीधर नाईक, विजय भिसे, अंकुश राणे, गोवेकर यांच्या हत्या कशा झाल्या हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. असे सांगत त्यांनी राणेंना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंचेही शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नाव आहे. याची आठवण त्यांनी करुन दिली.

शिंदे गट झाल्यामुळे नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे चर्चेत यावं म्हणून नितेश राणे असे आरोप करीत आहेत. असेही नाईक म्हणालेत. सुपारीबाज कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू. असे प्रतिआव्हानच नाईक यांनी दिले आहे.

Raj Thackeray MNS Manifesto; 'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?

'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी

अभिनेता शाहरुख खान धमकीप्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"!! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा