रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला. अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपकडून नारायण राणे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या जागेसाठी शिवसेना गटाचे किरण सावंत इच्छुक होते. परंतू आता भाजपकडून नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
रत्नागिरी-सिंदुधुर्गमध्ये आता महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहे. कोकणात आता ठाकरे विरुद्ध राणे महालढत होणार आहे. यांचा सामना ठाकरेंच्या शिवसेने गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 13वी उमेदवार यादी जाहीर केली असून त्यात एकमेव नाव असून ते नारायण राणे यांचं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून आता नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत. तसंच किरण सामंत आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान, या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची देखील चर्चा होती.आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे.