राजकारण

पुन्हा अशी भाषा वापरली तर...; पंतप्रधानांचे नाव घेत नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंना इशारा

उध्दव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस फडतूस गृहमंत्री असल्याची टीका त्यांनी केली होती. यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी भेट घेत विचारपूस केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असल्याची टीका त्यांनी केली होती. यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला असून भाजप नेते नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. फडतूस शब्दाचा अर्थ कळतो का? मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशी भाषा वापरावी का? अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, याचा विसर पडला, अशी खरमरीत टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

सामना वृत्तपत्र म्हणणार नाही. आज सामना वाचा व यात चांगले काय ते सांगा. देशहिताचे, सर्वसामान्य माणसाला रुचेल अशी भाषा आहे का? राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी असे वृत्तपत्र सुरु ठेवावे का? प्रेस कौन्सिलने तक्रार केली नाही, तर मी करणार आहे. याबाबत कोर्टात जाणार असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले.

काल ठाण्यात घटना घडली. भयानक घडले असे वातावरण तयार केले. विषय खरंच गंभीर होता का? राज्याचे निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याला गेले. जाताना डिलिव्हरी करायला जातोय असे सांगितले. मुख्यमंत्री पदावरून उतरल्यानंतर नवीन काम सुरु केले आहे. उध्दव ठाकरेंचे भाषण महाभयानक होते. तुमच्याहून जास्त मी त्यांना ओळखतो. अत्यंत असभ्य व शिवराळ भाषा होती. एखाद्याबाबत चीड असते तेव्हा अशी भाषा वापरली जाते. त्यांच्यावर भाष्य न केलेलं बरे. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशी भाषा वापरावी का? अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, याचा विसर पडला, अशी खरमरीत टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

बाळासाहेबांचे पुत्र सोडले तर देशाच्या प्रगतीत योगदान काय? कामगार, शेतकरी, विद्यार्थी प्रश्न माहिती आहेत का? बाळासाहेबांचे नाव, शरद पवारांचे मेहेरबानीने मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांच्या नखाची सर नाही. शिवसेना वाढीत उध्दव ठाकरेंचे योगदान काय? अडीच वर्षात काय कमावले शिवसेनेला काय दिले, असा घणाघातही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरेंना देवेंद्रजी ओळखत नाही. मी पूर्वीपासून ओळखतो. मी सांगितले होते देवेंद्र फडणवीस यांना आता त्यांना पटले. रोशनी शिंदे या पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीसांवर बोलतात. लायकी आहे का? मी पक्षप्रमुख असतो तर दम दिला असता. देशाचे पंतप्रधान व माजी मुख्यमंत्री बाबत बोलणे अयोग्य आहे. पुन्हा अशी भाषा वापरली, तर पंतप्रधान एक बोट दाखवतील. मग तुला कुठे जावे लागेल ते समजेल, अशी थेट धमकीच नारायण राणेंनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

फडतूस शब्दाचा अर्थ कळतो का? फडणवीस मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते होते. भाजपाने २०१४साली आधार दिला नसता, तर आमदार निवडून आले नसते. मी सांगत होतो, युती नको. आम्ही रस्त्यावर उतरतो, म्हणतात. जाहीर करा, कुठल्या मैदानात येणार. मी एकटा येतो. वैचारिकता, बौद्धिकता, कार्य तत्परता देवेंद्र फडणवीस यांच्यामधील एक तरी गुण तुमच्यात आहे का, असा प्रश्नदेखील त्यांनी केला आहे.

काही राज्यात माणूस मेल्यावर रडायला माणसं बोलवतात. तशी गत उद्धव ठाकरेंची झाली आहे. बाई गरोदर आहे की नाही माहिती नाही. मुलगा व पत्नीला घेऊन उद्धव पोहचतात रडायला. आता भवितव्य नाही तुम्हाला. सभा आणि दौरे बंद करा, असा खोचक सल्लाही नारायण राणेंनी उध्दव ठाकरेंना दिला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Latest Marathi News Updates live: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे