नागपूर : महाराष्ट्राच्या जनतेला अलिबाबा चाळीस चोर या कथेची आठवण व्हायला लागली असल्याचे जोरदार टीकास्त्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सोडले आहे. तसेच, महाराष्ट्रात कायदा व्यवस्था बरोबर नाही म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राष्ट्रपती राजवटीबद्दल आम्ही राज्यपालांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या जनतेला अलिबाबा चाळीस चोर या कथेची आठवण व्हायला लागली आहे याची कारणे पण वेगळी आहेत. जनतेच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही मोठे आश्वासन देऊन भाजप सत्तेवर आली. 105 आमदार भाजपला निवडून दिले ही चूक झाली असे आता जनतेला वाटत आहे. जनतेचे पैसे लुटायचे जमा करून आपसात भांडण व्हायचं अशी ती अलिबाबा चाळीस चोरांची कहाणी आहे आज सरकारची पण महाराष्ट्रात तीच अवस्था आहे, अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली आहे.
एक सुलतानी जीआर महाराष्ट्र सरकारने काढला असून निवृत्त शिक्षकांना वीस हजाराच्या मानधनावर रिक्त पदी भरती करण्यात येणार आहे. हे तरुणांवर कुऱ्हाड चालवत आहेत. निवृत्तांना कामावर लावून तरुणांवर आघात करणारे हे सरकार आहे. या सरकारचा निषेध करतो महाराष्ट्रात कायदा व्यवस्था बरोबर नाही म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खाते वाटपामध्ये मलाईदार खाते कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी महाराष्ट्राला हे भूषणावर नाही. तातडीने राज्यपाल व राष्ट्रपती हस्तक्षेप केला पाहिजे. भीती दाखवून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रपती राजवटी बद्दल आम्ही राज्यपालांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
सरकार आता मायबाप राहिला नाही हे जनतेला लुटणार सरकार झालं आहे जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. अनेक भागात पेरणी झालेली नाही. अवकाळी पावसाची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत याचं देणंघेणं कोणालाच नाही.
17 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे त्यावेळी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष नेत्याबाबत अध्यक्षांना पत्र देईल. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा विरोधी पक्ष होतो हे सिस्टम आहे आता दोन्ही सभागृहात काँग्रेसकडे जास्त आमदार आहेत महाविकास आघाडीचा जो प्रश्न आहे तो चर्चा करू, असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.