मुंबई : मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेप्रकरणी सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. याचे पडसाद आता अधिवेशनातही उमटले असून विरोधी पक्षांनी पायऱ्यांवर मोदी सरकारविरोधात आंदोनल केले आहे. यावेळी नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चोर म्हटल्यावर कारवाई होते तर आम्ही डाकू म्हणणार, अशी टीका त्यांनी केली आहे.
लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील हा निर्णय आहे. जनतेचे पैसे घेऊन पळालेले लोकांना भाजप सपोर्ट करतो. हे भाजपा ठरवून करत आहे. आम्ही याचा निषेध करतो. जसे इंग्रज वागत होते, दबावाखाली ठेवायचे तसाच प्रकार सुरु आहे. तरीही राहुल गांधी बोलणाणारच. आम्ही भाजपा, मोदींचा निषेध करतो. आम्ही याविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे नाना पटोलेंनी म्हंटले आहे. चोर म्हटल्यावर कारवाई होते तर आम्ही डाकू म्हणणार, असा निशाणाही त्यांनी मोदी सरकारवर साधला आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.