किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय. यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, माध्यमांचा आवाज दाबण्याचा हा जो काही प्रयत्न सुरु आहे. हा आपण सगळीकडे खुल्याने पाहिलेला आहे. पोलिसांनी हा व्हिडिओ खरा असल्याचे सांगितले आहे तर मग आता गुन्हे दाखल कशासाठी? हा सत्येचा दुरुपयोग आहे याचा आम्ही निषेध करतो.