राजकारण

रावणानेही भगवे कपडे घालून सीतेला पळवून नेलं होतं; नाना पटोलेंचा शिंदेंना टोला

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या वारी करत रामलल्लाचं दर्शन घेतले. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अयोध्या वारी करत रामलल्लाचं दर्शन घेतले. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले आहे. हिंदूंचे ठेकेदार म्हणवणारे, सोंग घेणारे लोक भगवा घातला म्हणजे साधू संत होत नाही, असा निशाणा पटोलेंनी शिंदे गटावर साधला आहे. रामाच्या नावाने पैसे गोळा करणारे हे नकली रामभक्त आहेत हे लोकांनी ओळखले आहे, अशीही टीका त्यांनी केली.

हिंदूंचे ठेकेदार ते झालेले नाहीत. स्वतःला हिंदुत्वाचे सोंग घेणारे लोक आहेत. रावणाने देखील भगवे कपडे घालून सीतेला पळवून नेलं होतं. भगवा कपडा घातला म्हणजे साधू-संत होता येत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. घामाचा पैसा रामाच्या व श्रध्देच्या नावाने लुटला पाहिजे. रामाच्या नवाने हे पैसे गोळा करणारे, हे नकली रामभक्त आहेत हे लोकांनी ओळखले आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसला असताना दिखावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांना राम भक्त म्हणणार का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा मानतो, पण भाजप छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले आदींचा अपमान करते. कोणत्याही गोष्टीला हिंदुत्वाचा मुद्दा बनवत आहे. आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. अदानी वर आमची जेपीसीची मागणी अजूनही तशीच आहे. अदानी प्रकरणात तो आपल्या देशातील सर्वसामान्यांचा पैसा होता. जनतेचा पैसा लुटला आहे. प्रत्येक पैशांचा हिशोब मोदींना द्यावा लागेल, असे नाना पटोलेंनी म्हंटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात बैठका घेत असतो. संपूर्ण महाराष्ट्रात हुकूमशाही आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांना व कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते. पोलिस आमची एफआयआर घ्यायला तयार नाहीत. रोशनी शिंदे प्रकरणातही पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. शेतकरी आणि गोरगरीब लोकांचे अनेक प्रश्न चर्चेसाठी आहेत. ठाण्यात कायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे, मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय