पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे (Assembly elections) निकाल लागले आहेत. .उत्तर प्रदेशात तरी 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) यशस्वी झाले आहे. उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड अशा पाच राज्यांतील निकालांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) उत्साहाचे भरते येणे साहजिक आहे. पंजाब वगळता इतर चार राज्यांत भाजपने सत्ता राखली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेसने 30 वर्षांनंतर प्रियांकाच्या नेतृत्वाखाली लढली खरी पण काँग्रेसला साफ अपयश आले. पक्षाला 403 पैकी फक्त 2 जागा जिंकता आल्या. प्रियंका येण्यापुर्वी 2017 मध्ये काँग्रेसच्या 7 जागा होत्या त्या आता 2 वर आल्या आहेत. काँग्रेसमध्ये नेतृत्व परिवर्तनाची मागणी करणारे G-23 नेते आता काय करणार? याकडे लक्ष लागले आहे. आज या नेत्यांची गुलाबनबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे.
काँग्रेसमध्ये २३ नेतांचा एक गट आहे. हा गट G-23 नावानं ओळखला जातो. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर G-23 म्हणून ओळख झालेले काँग्रेस नेते नाराज आहेत. काही महिन्यांपूर्वी या गटानं काँग्रेसच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात या नेत्यांनी काँग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी केली होती. आता काँग्रेसचे पाच राज्यांतील निवडणुकीत दारुण पराभव झाला. पंजाबसारखे राज्य होते ते ही गेले. यामुळे काँग्रेसची आता केवळ राजस्थानमध्येच सत्ता आहे. महाराष्ट्रात तिसरा पक्ष म्हणून काँग्रेस सरकारमध्ये आहे.
उत्तर प्रदेशसारख्या मोठया राज्यांत काँग्रेसने चांगली रणनिती आखली. त्यांचे ब्रम्ह्यास्त्र म्हणून ओळखले जाणारे अस्त्र बाहेर काढले. प्रियंका गांधी यांनी आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला नव्हता. मात्र, त्यांनी उत्तर प्रदेश पिंजून काढला. योगी सरकारविरोधात रण उठवले. महिलांना फोकस करत ४० टक्के उमेदवारी महिलांना दिली. परंतु त्यातील एकही महिला निवडून आली नाही.
पत्र पाठवणारे काँग्रेसचे नेते
सोनिया गांधींना पत्र पाठवणार्या नेत्यांमध्ये अनेक माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर यांचा समावेश होता. भूपिदंरिंसह हुडा, रािंजदरिंसह भट्टल, एम. वीरप्पा मोईली आणि पृथ्वीराज चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यानीही पत्रावर स्वाक्षरी केली होती. राज बब्बर, अरिंवदरिंसह लवली, कौलिंसह हे माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्षही या मोहिमेत सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेस महासमितीचे मुकुल वासनिक, विवेक तन्खा, जितीनप्रसाद यांचाही समावेश होता. अखिलेशप्रसादिंसह, संदीप दीक्षित, योगानंद शास्त्री, कुलदीप शर्मा यांचाही या मोहिमेत सहभाग होता.