आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. हा दौरा आगामी मुंबई महानगरपालिकेच्या मोर्चे बांधणीसाठी असल्याची चर्चा सध्या होत आहे. भाजप यंदाच्या महापालिका निवडणुकीत पूर्ण प्रयत्नाने उतरणार असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. अशातच, अमित शाह यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या 200 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी भाजपकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
काय म्हणाले फडणवीस?
आज अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत संबोधन केले. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देशाला चाणक्य कोण आहेत हे माहीत आहे आणि चाणक्य म्हणजे अमित शाह आहेत, अश्या शब्दात फडणवीसांनी शाहांचे कौतूक केले.
पुढे फडणवीस म्हटले की, मुंबईत खरी शिवसेना आमच्यासोबत आली आहे. यंदा झालेल्या गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले. 'मिशन मुंबई' साठी सर्व पदाधिकरी, नगरसेवक आणि कार्यकरत्यांची महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीसांनी म्हटले आहे.