राजकारण

कारागृहातून सुटल्यानंतर नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज, म्हणाल्या...

Published by : Team Lokshahi

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेनंतर कारागृहात गेलेल्या नवनीत राणांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.(Navneet Rana discharged from Lilavati Hospital) रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांनी पुन्हा ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले. माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी ठाकरे सरकारविरोधात आता चांगलेच दंड थोपटले असून संजय राऊतांवरही टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

माध्यमांशी बोलतांना राणा म्हणाल्या की, "प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगण्यास तयार आहे. तुम्ही दाबू शकत नाही. महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे दिल्लीत करणार आहे. तसेच, दिल्लीत जाऊन संजय राऊतांचीही तक्रार करणार आहे. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट आव्हान दिलं. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, तसेच आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राऊत म्हणजे पोपट

नवनीत राणांनी संजय राऊत यांना पोपट असं अप्रत्यक्षपणे संबोधलं आहे. त्या म्हणाल्या की, ज्या पद्धतीने पोपटाने नागपूरच्या पत्रकार परिषदेत २० फूट खोल खड्ड्यात गाडू असं म्हटलं होतं. येणाऱ्या काळाय मुंबई आणि महाराष्ट्राची जनताच त्यांना खड्ड्यात टाकणार आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी मी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार करणार आहे.

फडणवींचा ठाकरे सरकारवर निशाना

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्ह्य दाखल झाला होता. त्यातून 12 दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका झाली. परंतु त्यांना कारागृहात मिळालेल्या वागणुकीवर अनेक आरोप-प्रत्योरोप होत आहे. आता राणा दाम्पत्याला दिलेल्या वागणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. (Navneet Rana discharged from Lilavati Hospital)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा(Navneet Rana) यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, "नवनीत राणा यांची तब्येत आता स्थिर होत आहे. परंतु एकूणच त्यांना कारागृहात जी वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. एखाद्या सराईत गुन्हेगारालाही वागणूक दिली जात नाही, त्याहून वाईट वागणूक रवी आणि नवनीत राणा यांना दिली. महाविकास आघाडी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी