राजकारण

Amol Kolhe : राजेंद्र शिंगणे यांच्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हे यांचं भाष्य; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

राजेंद्र शिंगणे यांच्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. मी जरी अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन -अडीच वर्षापासून मी पवार साहेबांशी संबंध तोडले असे नाही. मी नाईलाजाने अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो. आज जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेलं आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतील. असे राजेंद्र शिंगणे म्हणाले.

यावर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, राजेंद्र शिंगणे यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य म्हणजे यांच्यावर जो दबाव टाकण्यात आला त्याची कबुली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हा पर्दाफाश झालेला आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, या पद्धतीने सरकार बनवण्यासाठी या स्वार्थासाठी जी काही तोडफोड करण्यात आली ही दबावाच्या राजकारणाखाली करण्यात आली याची कबुली आहे असे अमोल कोल्हे म्हणाले.

Vanchit Bahujan Aaghadi कडून तिसरी यादी जाहीर

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा ब्लॅक ड्रेस लूक पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

Breaking NEWS | New Justice Statue In Supreme Court | न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली...

Diwali 2024: दिवाळीत लक्ष्मीपूजनसाठी देवी समोर लावा पणतीपासून तयार केलेली सुंदर समई...

मोठी बातमी: न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली