मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधातली तक्रार मागे घेण्यासाठी भाजप नेते मोहिम कंबोज यांनी न्यायालयाला विनंती केल्याची बातम्या सध्या सुरु आहेत. या प्रकरणी मोहिम कंबोज यांनी स्वतः माहिती दिली आहे. नवाब मलिकांविरोधातील कुठलाही मानहानीचा दावा मागे घेतलेला नाही. काही माध्यमांत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या. मलिकांविरोधातील सुनावणी आजही न्यायालयात सुरु असल्याचा खुलासा कंबोज यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले होते. याविरोधात कंबोज यांनी शिवडी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीवेळी मलिक मोठ्या प्रमाणात समर्थकांना घेऊन न्यायालायात हजर झाले. यामुळे मलिकांनी कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप कंबोज यांनी केला होता.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच नवाब मलिकांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या घरी राजकीय भेटीगाठी वाढल्या आहे. नवाब मलिक जेव्हा कोठडीत गेले तेव्हा राष्ट्रवादी एकच होती. पण आता कोठडीतून बाहेर पडताना त्या राष्ट्रवादीची दोन गट झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक बाहेर येऊन नक्की कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.