राजकारण

MNS : अंबरनाथ तालुक्यातील डोणे गावातील पोटनिवडणुकीत मनसेने मारली बाजी

अंबरनाथ तालुक्यातील डोणे गावात झालेल्या ग्रामपंचात पोटनिवडणुकीत मनसेचा उमेदवार सुजाता पालांडे या बहुमताने विजयी झाल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

किरण तेलगोटे, अंबरनाथ

अंबरनाथ तालुक्यातील डोणे गावात झालेल्या ग्रामपंचात पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार सुजाता पालांडे या बहुमताने विजयी झाल्या आहेत. पॅनल नंबर एक डोणे गावात पोटनिवडणुकीत दोन उमेदवार उभे होते. चारुशीला पालवे वंचित बहुजन आघाडी ठाकरे गट आणि सुजाता पालांडे या दोघांमध्ये निवडणूक सुरू होत्या.

रविवारी पार पडलेल्या मतदान नंतर आज सकाळी अंबरनाथ तहसील कार्यालयात दोन्ही उमेदवारांचे मतदान मोजणी करताना सुजाता पालांडे या बहुमताने विजय झाले असून चारुशीला पालवे यांचा पराभव झालाय गावात रखडलेल्या विकास कामाला गती देण्याचं काम सुजाता पालांडे करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Raj Thackeray MNS Manifesto; 'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?

'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी

अभिनेता शाहरुख खान धमकीप्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"!! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा