Raj Thackeray | Bhagatsingh Koshyari Team Lokshahi
राजकारण

राज ठाकरेंची राज्यपालांवर सडकून टीका; म्हणाले, पत येते, पण पोच...

राज्यपालांना कोणी काही सांगते की काय असे वाटते. वाद उकरून काढायचे आणि सर्व फोकस दुसरीकडे वळवायचा असं काही सुरू आहे का असं वाटतं.

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे वादग्रस्त विधानाचे सत्र सुरु आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आजही कायम आहे. या विधानामुळे राज्यपालांवर चहुबाजूने टीका केली जात. त्यातच आता राज्यपाल हटावच्या मागणीनेही जोर धरला आहे. त्याच विधानावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यपालांना कोणी काही सांगते की काय असे वाटते. वाद उकरून काढायचे आणि सर्व फोकस दुसरीकडे वळवायचा असं काही सुरू आहे का असं वाटतं. या मागे व्यूव्हरचना सुरू आहे का? अशी शंकाही येते. माणसाला पत येते, पण पोच येत नाही. त्यांना ती पोच नाहीच, अशी टीका राज ठाकरे यांनी राज्यपालांवर केली.

पुढे ते म्हणाले की, शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. फक्त वाद सुरू ठेवा. महाराजांनी जे सांगितलं जे घडवलं ते काही घेऊ नका. फक्त वाद करा. करत बसा म्हणावं. आपलं अपयश झाकण्यासाठी यासर्व गोष्टी काढल्या जातात. अनेक विषय काढले जातात. इतर विषयांवरचं लक्ष डायव्हर्ट होतं. त्यासाठीच हे सुरू आहे, असे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

इतिहास रंजित करूनच मांडावा लागतो

कुणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं करू नका. तुम्ही अॅथोरिटी नाहीये. जी लोकं आहेत त्यांच्याकडून कागदपत्रं तपासा. जे लेखक आहेत, सिनेमा करणारे आहेत. त्यांना भेटा. त्यांच्याशी एकदा बोला. तुम्ही चित्रपट करत आहात त्याबाबतचं तुम्ही कसलं संशोधन करत आहात. कुठून पुरावे घेतले ही माहिती त्यांना विचारा, असंही त्यांनी सांगितलं. इतिहास रंजित करूनच मांडावा लागतो. पुरावे नसतात. त्यामुळे कल्पना मांडावी लागते. पण ते करताना इतिहासाला डाग लागता कामा नये, लोकांना स्फूर्ती मिळावी यासाठीच हे केलं जातं. त्यासाठीचं चित्रपट हे माध्यम आहे. तानाजी सिनेमात जे दाखवलं ते सर्वच तसं घडलं होतं का? नाही. मग ते दाखवलं नसतं तर तुम्ही सिनेमा पाहिला असता का? असा सवालही त्यांनी केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'माझा बुथ, सर्वात मजबूत' अभियान

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाची गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ