Sandeep Deshpande  Team Lokshahi
राजकारण

जगदंबा तलवार कधी येईल ते भवानी मातेलाच माहिती, मनसेचा शिंदे- फडणवीस सरकारला टोला

ते पक्के ब्रिटिश आहेत एवढ्या सहजरीत्या ती तलवार येईल असे काय वाटत नाही. पण भाजपच सरकार आहे तर आशा ठेऊया

Published by : Sagar Pradhan

शिंदे-फडणवीस सरकार लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार' महाराष्ट्रात परत आणणार आहे. ही शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार आहेत. अशी माहिती भाजप नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मात्र, या विषयावरून राज्यात पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. त्यावरूनच अनेक आरोप- प्रत्यारोप सुरु असताना त्यावरच मनसे देखील या वादात उडी घेतली आहे. मनसे सरचिटणीस देशपांडे यांनी यावरून शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले देशपांडे?

'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या निर्णयावर बोलताना देशपांडे म्हणाले की, भवानी तलवारीचा विषय आम्ही लहानपणापासून ऐकत आहे. ऋषि सुनक पंतप्रधान झाल्यामुळे लोकांच्या आशा वाढल्या आहेत, पण ते पक्के ब्रिटिश आहेत एवढ्या सहजरीत्या ती तलवार येईल असे काय वाटत नाही. पण भाजपच सरकार आहे तर आशा ठेऊया बाकी तलवार कधी येईल ते भवानी मातेलाच माहिती. असा टोमणा यावेळी देशपांडे यांनी राज्यसरकार आणि भाजपला लगावला आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result