Raj Thackeray  Team Lokshahi
राजकारण

लक्ष विचलीत करण्यासाठी सीमावादाचा मुद्या आताच समोर, राज ठाकरेंचं सीमावादावर मोठे विधान

सीमावादाचा प्रश्न सध्या न्याय प्रविष्ठ आहे. न्यायालय त्यावर निर्णय देईल. पण माध्यमांचा आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न तर करत नाही ना.

Published by : Sagar Pradhan

मुंबईतील नेस्को येथे नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी चालू असलेल्या सर्वच राजकीय विषयावर भाष्य केले होते. मात्र, यावेळी राज ठाकरे यांनी राज्यात सीमावादावरून चालू असलेल्या विषयावर भाष्य केले नव्हते. त्यावरच आता कोल्हापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतके दिवस बासणात असलेला हा प्रश्न नेमका आताच कसा वर आला? इतर प्रश्नांवरुन लक्ष वळविण्यासाठी तर हा प्रश्न समोर आणण्यात आला नाही ना? असा सवाल ठाकरे यांनी यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

कोणत्या तरी महत्वाच्या मुद्यावरुन भरकटवण्यासाठी, लक्ष विचलीत करण्यासाठी सीमावादाचा मुद्या आताच समोर आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.सीमावादाच प्रश्न नेमका आताच कसा समोर आला, असा प्रश्न करत, त्यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं. अर्थात सीमावादाचा मुद्दा समोर करुन कोणीतरी राज्यातील मुळ प्रश्नांवरचे लक्ष दुसरीकडे वळवित असल्याचा अप्रत्यक्ष आरोप ठाकरे यांनी केला. कोणीतरी त्यासाठी प्रयत्न तर करत नाही ना? असा सवाल त्यांनी केला. सीमावादाचा प्रश्न सध्या न्याय प्रविष्ठ आहे. न्यायालय त्यावर निर्णय देईल. पण माध्यमांचा आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न तर करत नाही ना, असे ते यावेळी म्हणाले.

राज्यपालांवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया?

“राजकारणात असे अनेक लोकं आहेत जी काही पदांवर बसलेली आहेत. असे अनेक माणसं आहेत, ज्यांना पद येते पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहे. पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावं याबद्दल कळत नाही. मागच्यावेळी ते जोतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते. हे छोटे-छोटे बच्चे तब ये शादी करते, कैसे करते होगे? कैसे म्हणजे पूर्वीच्याकाळी लहान मुलांचं लग्न व्हायचं. कोश्यारींचं अजून नाही झालं”, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली.

“मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? तुमचं सगळं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात. मुर्ख माणसं आहेत. आपल्या महाराजांना याने काही फरक पडत नाही. ही कोण माणसं आहेत? या लोकांना टेलिव्हिजनवर जागा देऊ नका. पण तुम्ही थांबत नाहीत”, असं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट