राजकारण

“हिंदुहृदयसम्राटांचे भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी”

Published by : Lokshahi News

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली षण्मुखानंद सभागृहात पार पडला. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचे भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून भाजप नेते प्रवीण दरेकर तसेच नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. तर पुढे ते म्हणाले, 'मुख्यमंत्री यांनी केलेल्या हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदूंपासुन या वक्तव्यावर देशपांडे यांनी पलटवार केला आहे ते म्हणाले की मला ते हिंदू , नवहिंदू कळत नाही पण ही नवीन शिवसेना आहे अस मला वाटतं आणि ही नवीन शिवसेना आहे त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे.'

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमध्ये एक उर्जा असायची आता काय सगळ अळणी झालेले आहे. मीठ नसलेल्या जेवणासारखे कालचे भाषण होते आणि त्यामुळेच अशा पद्धतीचा आता लोकांना ही कंटाळा वाटायला लागलेला आहे. यासर्व प्रकरणात आता शिवसेनेकडून नेमकं काय प्रत्युत्तर मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result