राजकारण

'आफताबला आमच्या ताब्यात द्या, त्याचे 100 तुकडे करायला मनसे सज्ज'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आफताबबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनोज चव्हाण म्हणाले की, खुनी अफताब हा महाराष्ट्राचा गुन्हेगार आहे. त्याला आमच्या ताब्यात द्या. त्याचे 100 तुकडे करण्यास मनसे सज्ज आहे. उद्या कोणी वकील त्याच्या जामीनाचा अर्ज करणार. अस करण्यापेक्षा हे कायदे बदलण गरजेचे आहे. जसे रांझे पाटलांनी स्त्रीवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकडे करुन त्याचा चौरंग केला. असाच कायदा देशात अंमलात आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण?

मुळची वसईतील श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ