राज ठाकरे (Raj Thackeray)यांची रविवारी पुण्यात (Pune Rally)झालेली सभा चांगलीच गाजली. सभा गजण्याचे कारण म्हणजे अयोध्या (Ayodhya)दौऱ्याबातत राज ठाकरे यांनी केलेली वक्तव्य. राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्यानंतर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रातून कोणी रसद पुरवली, याची जोरदार चर्चा सुरु झाली. ही नावे शिवसेनेपासून (Shiv Sena)भाजपपर्यंत गेली. अखेरी मनसेकडून आज एक फोटो टि्वट करत रसद पुरवण्यासंदर्भात मोठा खुलाशा केला आहे.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला. त्याला मोठे कारण भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यांकडून झालेला विरोध आहे. आता मनसेकडून बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो टि्वटवरुन शेअर केला गेला. त्यानंतर पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या फोटोंवरुन राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रसद पुरवली गेल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
मनसेचे नेते सचिन मोरे यांनी एक टि्वट केले आहे. त्यात "कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…" , असे वक्तव्य लिहितशरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यातील एका फोटोत बृजभूषण सिंह सोबत शरद पवार तर दुसऱ्या फोटोत सुप्रिया सुळे दिसत आहेत. परंतु हे फोटो नेमके कधीचे आहेत त्याचा उल्लेख केला नाही.
हा महाराष्ट्रात चुकीचा पायंडा
मनसेचे नेते गजानन काळे यांनी सांगितले की, आज फोटो समोर आल्याने या सगळ्या कथानकामागचा निर्माता कोण हे महाराष्ट्राला आणि देशाला समजलं. महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा राजसाहेबांनी आरोप केला होता. या फोटोतून त्याला पुष्टी मिळाली. हा महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडतोय. राज ठाकरे यांचा हा कोणताही राजकीय दौरा नव्हता. दक्षिणेत एखाद्या नेत्यांला असा विरोध केला गेला असता, सर्व राजकीय पक्ष आणि नेते एकत्र आले असते. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात हे दिसत नाही, असे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सांगितले.