राज्यात नुकताच शिक्षक आणि पदवीधर निवडणुक पार पडली. पाच जागांसाठी ह्या निवडणुका झाल्या. परंतु, सर्वात जास्त चर्चेत आला. तो म्हणजे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ या जागेमुळे मोठा पेच निर्माण झाला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भराला. त्यानंतर काँग्रेसने नेते डॉ. सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबन केलं. मात्र, आता सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले सत्यजित तांबे?
आज पत्रकार परिषदेत बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, मी एक दोन पत्रकार परिषदेत ऐकलं की नाशिक पदवीधर मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय तांबे कुटुंबाला घ्यायचा होता. मग बरोबर 12.30 वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर झाली? माझे वडील सांगत होते. मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला उभं करायचं आहे, तर मग वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीतील एकाही जागेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावती, नागपूरमधील उमेदवार दिल्लीतून जाहीर झालं नाही? मग एकच नाशिकचा उमेदवार दिल्लीतून का जाहीर झाला? हे सर्व एका षडयंत्राचा भाग आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हे सगळी स्क्रिप्टेड स्टोरी होती. हे सर्व षडयंत्र बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजीत तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी आमच्या कुटुंबाला पक्षाबाहेर ढकलण्यासाठी करण्यात आले होते. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मी सगळ्याच पक्षांकडे पाठिंबा मागायला जाणार आहे आणि त्यात भाजपाचेही नाव घेतले. परंतू, मी भाजपाचा पाठिंबा घेणार अशी बातमी चालवण्यात आली. पक्षांतर्गत ही स्क्रिप्ट आधीच तयार झाली होती. त्याला बळ देण्याचे काम काही लोकांनी केले गेले. मला भाजपात ढकलण्याचेच देखील काम झाले. हे अर्धसत्य मागील २५ दिवसांपासून सुरू होतं. त्यामुळे मी पुढे आलो.असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.