राजकारण

शिवसेनेच्या कारवाईवर संतोष बांगर म्हणाले, मी बंडखोरी...

२००९ पासून आमदार Santosh Bangar हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

गजानन वाणी | हिंगोली : शिवसेना (Shivsena Rebel MLA) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक होत बांगर यांना हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हटविले आहे. हा बांगर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष बांगर म्हणाले, मी हे मान्य करत नाही. बाळासाहेब हयात असताना त्यांनी मला हिंगोली जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली होती. मी आताही ती जबाबदारी पार पाडत आहे. कोणी म्हणत असेल की मला जिल्हाध्यक्ष पदावरून कमी केलं. मी कुठेही बंडखोरी केली नाही. मी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केलं. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच राहणार, असं त्यांनी म्हंटले आहे.

२००९ पासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. आता त्यांना या पदावरुन हटवण्यात आले आहे. बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर आता नवीन जिल्हा प्रमुख निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करीत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंडाळीनंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार निघून गेले. त्यावेळी संतोष बांगर ढसाढसा रडले होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी रडलेही होते. त्या नंतर बांगर अवघ्या काही तासांत हे शिंदे गटात सहभागी झाले होते.त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केलं होते.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...