MLA Rajendra Patni Team Lokshahi
राजकारण

भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांना लागले मंत्रिपदाचे डोहाळे?

Published by : Vikrant Shinde

गोपाल व्यास, वाशीम

वाशीम जिल्हयातील वाशीम व कारंजा मतदार संघात भाजपाचे आमदार असून, कारंजा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी हे मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळविण्यासाठी सर्वकष प्रयत्न करीत आहेत. मात्र, आ. पाटणी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदार राजेंद्र पाटणी हे कारंजाचे आमदार असले तरी स्वताच मतदारसंघात ते किती काळ मतदारसंघात वास्तव्याला असतात हा एक संशोधनाचा विषय बनला आहे? आणि मतदारसंघाततील कामे पाहली तर यावर नागरिक सुद्धा रोष व्यक्त करतात कारण आमदार पाटनी हे जेव्हा पासून निवडून आले तेव्हा पासून त्यांनी वाशिम कारंजा मतदारसंघात दुर्लक्ष केलं.शहरासह ग्रामीण भागातील रस्त्याची दृरअवस्था जागोजागी मोठमोठे खड्डे पाण्यासाठी महिलांची भटकंती अश्या अनेक समस्या आहेत जाकडे आमदार राजेंद्र पाटनी यांनी दुर्लक्ष केलं.

कारंजा मतदार संघात तीनवेळा निवडून येऊन व आमदार राहूनही या मतदार संघाचा पाहिजे तसा विकास झाला नाही. कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. मात्र त्यामुळे मतदार संघात त्यांच्याप्रती रोष व्यक्त केल्या जात असून त्यामुळे आ. राजेंद्र पाटणी यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी कारंज्यात आता मोठ्या प्रमाणात जोर धरु लागली आहे.

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने अनेक आमदार गुडग्याला बाशिंग बांधून तयार झाले आहे. त्यातीलच एक आमदार चर्चेत असणारे राजेंद्र पाटणी. वाशिम कारंजा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. कारंजा येथील आमदार असले तरी त्यांचे स्थान कायमचे वास्तव्य मुंबईला असून, अधुन मधुन वेळ मिळाला तेव्हा कारंजामध्ये धावता भेट देऊन निघून जातात.

कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्यात ग्रामीण भागात विखुरला असून, ग्रामीण भाग अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत पसरले आहे. मंत्री होण्याची प्रत्येक आमदाराची हौस असली तरी प्रत्येकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेलच हे शक्य नाही. पाटनी यांची आमदारकीची तिसरी टर्म असल्याने मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी आ.राजेंद्र पाटणी यांची अपेक्षा आहे. मात्र आमदारांच्या मतदारसंघात नागरिकांची कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.

मतदारसंघातील जनतेला काही अडचणी आल्या तर आमदार यांच्याशी संपर्क करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते सहज शक्य नाही. अशा या पोरक्या मतदार संघातील आमदार पाटनी उद्या मंत्री झाले तर या मतदार संघाचा काय फायदा असा गंभीर प्रश्न ग्रामस्थ यानिमित्ताने उपस्थित करीत.

वाशिम कारंजा शहर असो वा ग्रामीण भाग आजच्या घडीला विकासापासून कोसो दूर असून शहरातील एकही रस्ता बरोबर नाही. या रस्त्यावरून वाहन चालवणे तर दूर पायी चालतानांही तारेवरची कसरत करावी लागते. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तीनवेळा आमदार राहूनही आ. राजेंद्र पाटणी हे मतदार संघाला न्याय देऊ शकले नाही, ते मंत्री झाल्यावरच काय कायापालट करणार अशी जनसामान्य नागरिक प्रश्नन उपस्थित करीत आहे. त्यामुळे आमदार पाटनी यांना मंत्री पद देऊ नये अशी चर्चा आता जोरधरू लागली आहे.

Navratri 2024: "या" कारणामुळे नवरात्री 9 दिवस साजरी केली जाते, जाणून घ्या...

Tripal Talaq: मुंबईतील ट्रिपल तलाक प्रकरण; तलाक प्रकरणातील आरोपीवर डोंबिवलीत गुन्हा

Rain Update: पुढील तीन तासात 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; रेड अलर्ट जारी

Navratri 2024: नवरात्रीदरम्यान जवसाचे धान्य पेरण्या मागे काय आहे कारण; जाणून घ्या...

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी