अनिल ठाकूर, चंद्रपूर
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात कार्यकर्ता संवाद बैठकीच्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमचं किशोर जोरगेवार यांच्याशी बोलणं सुरु आहे. मला अपेक्षा आहे. किशोर जोरगेवार भारतीय जनता पक्षामध्ये जी काय आमची चर्चा झाली आहे. त्याप्रमाणे ते येतील. आता त्यांचा निर्णय त्यांनी करायचा आहे.
आमच्याकडून त्याठिकाणी काही लपून छपून नाही आहे. ते आलेत तर आम्ही विचार करु, नाही आले तर आमचा जो काही कार्यकर्ता असेल तो लढू पण कमळ लढणार. सुधीरभाऊ बसतील, मी बसेन, देवेंद्रजी बसतील राजकीय निर्णय आहे.
राजकीय निर्णय सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, चंद्रपूरच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. त्याठिकाणी राजकीय प्रश्न सोडवून आम्ही करु असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.