माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा आज जामीन अर्ज फेटाळत देत, गिरगाव कोर्टाकडून त्यांना १४ दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. 2018 मधील राजकीय आंदोलन केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात त्यांना ही कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा देत बच्चू कडू यांना जमीन मंजूर करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार बच्चू कडू हे एम.पी.एस.सी , परीक्षा घेण्यात येणाऱ्या महापोर्टल बंद करण्यासाठी तत्कालीन , पी, प्रदीप .महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक यांची 26 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय येथे भेट घेतली होती. यावेळी पी प्रदीप आणि आमदार बच्चू कडू यांच्यत वाद झाला होता. तेव्हा , बच्चू कडू यांनी टेबलावरील लॅपटॉप पी प्रदीप यांच्यावर उगारला होता , त्यामुळे मंत्रालय कर्मचारी यांनी उग्र आंदोलन केले होते. तर याप्रकरणी प्रदीप यांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.