voice opposition | police system | central machinery | Varsha Gaikwad team lokshahi
राजकारण

'विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पोलिस यंत्रणा आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर'

इंग्रजांविरुद्ध लढताना काँग्रेस त्यावेळीही घाबरला नव्हता; आणि आताही घाबरणार नाही

Published by : Shubham Tate

police system : पोलिस यंत्रणा आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ज्या प्रमाणे काँग्रेस पक्ष इंग्रजांविरुद्ध लढला आणि स्वातंत्र्य मिळवले त्याचप्रमाणे आता सुद्धा लढले. काँग्रेस त्या वेळी ही घाबरला नव्हता आणि आता ही घाबरणार नाही, असा इशारा माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला. (Misuse of police system and central machinery to suppress the voice of the opposition Varsha Gaikwad)

त्या पनवेल तालुक्यातील उलवे नोड येथे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ किलोमीटर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील आझादी गौरव पदयात्रेसंबंधित माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती