ShivSena | MIM Team Lokshahi
राजकारण

आज शिवसेनेबद्दल मला सहानुभूती, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचे विधान

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे जोरदार राजकीय गोंधळ सुरु आहे, त्यातच शिवसेनेतील बंडखोरीमुळे दोन गट पडले आहे. आता दोन्ही गटांना स्वत्रंत्र नाव आणि चिन्ह मिळले आहे. त्यामुळे दोन्ही गटात जोरदार राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. अशातच औरंगाबाद एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना पक्षाबद्दल महत्वाचे विधान केले आहे. सोबतच त्यांनी भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले जलील?

राज्यातील सध्य परिस्थितीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांकडे आपले मत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, मी देखील मराठी आणि महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे शिवसेनेची झालेली अवस्था आणि मराठी माणसांत पडलेली फूट पाहून दुःख होत असल्याचेही भावना जलील यांनी व्यक्त केली आहे.

पुढे ते म्हणाले की, एमआयएमला फायदा मिळेल, नाही मिळणार ही वेगळी गोष्ट आहे. शिवसेनेबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. राजकीय मतभेद असतील. मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना उभी राहिली. मीदेखील मराठी माणूस आहे. मराठी लोकांवर कुठे काही झाले तर आपल्यासाठी कुणी उभे आहे या भावनेतून शिवसेना उभी राहिली. शिवसेनेचं धार्मिक रंग वेगळी बाजू आहे. शिवसेना फोडल्यानंतर काहीतरी चेंज झाल्याचं दिसून येते. सत्ता लागण्यासाठी जे कुणी येतील त्यांचे स्वागत असेल अशी भूमिका आहे. असे विधान यावेळी जलील यांनी केले.

जलील यांचा अमित शहांवर निशाणा

पुढे त्यांनी बोलताना भाजप आणि अमित शहांवर घणाघात केला आहे. तेव्हा ते म्हणाले की, महाराष्ट्रात लाज आणणारे घाणेरडे राजकारण सुरू आहे. राज्याला अस्थिर करण्याचे आणि मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे काम भाजपने केले आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला.आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती अमित शहा आणि भाजपमुळे झाली आहे. मराठी लोकांना त्यांनी फोडलंय, ते दुर्दैवी आहे. आतापर्यंत जे कुणी करू शकलं नाही, ते भाजपने केलंय. मराठी लोकांना फोडण्याचं पाप भाजपने केलंय, असा गंभीर खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर केली आहे.

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आज बीडसह, धाराशिव बंदची हाक

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ