राजकारण

MLC Election : सत्ताधारी, विरोधकांच्या बैठकीचं सत्र सुरु

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कॉंग्रेसने (Congress) अतिरीक्त उमेदवारी दिल्याने राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजप (BJP) विरुध्द महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) संघर्ष होणार आहे. या निवडणुकीत मतांची जुळवा-जुळव करण्यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने बैठकांचे सत्र सुरु केले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात 10 जागांसाठी महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत. तर, सहाव्या जागेच्या मतांची जुळवाजुळव करण्याचा मविआ आणि भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी मविआची संध्याकाळी 6 वाजता तर भाजपची सकाळी 12 वाजता बैठक होणार आहे.

महाविकास आघाडीची सकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार असून विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच, काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यासाठी आघाडीची खलबते होणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. तर भाजपाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी आज 12 वाजता भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद निवडणुकीबाबत मंथन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या 20 तारखेला 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा खापरे, प्रशांत लाड

राष्ट्रवादी कॉंग्रेस : एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर

शिवसेना : सचिन अहिर आणि आमशा पाडवी

कॉंग्रेस : भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Varsha Gaikwad: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

Nana Patole: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; नाना पटोले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...