Uddhav Thackeray | Prakash Ambedkar  Team Lokshahi
राजकारण

वंचित बहुजन आघाडी-शिवसेना युतीवर होणार शिक्कामोर्तब? उद्या ठाकरे- आंबेडकरांमध्ये पहिली बैठक

शिवसेना (ठाकरे गट) वंचितची युतीबाबतची ही पहिली अधिकृत बैठक असणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता, महालक्ष्मी फोर सिझन हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल.

Published by : Sagar Pradhan

राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडत असताना अशातच काही दिवसांपासून ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली होती. त्यातच उद्या सोमवारी शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. वंचितने शिवसेना(ठाकरे गट) युतीसाठी अगोदरच होकार दिला आहे. यावरच आता उद्या भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांच्यात उद्या बैठक पार पडणार आहे. त्यानंतर युतीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात लवकरच नवीन राजकीय समीकरण आकाराला येणार असे दिसत आहे.

शिवसेना (ठाकरे गट) वंचितची युतीबाबतची ही पहिली अधिकृत बैठक असणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता, महालक्ष्मी फोर सिझन हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व आले आहे. या बैठकीला दोन्ही पक्षातील काही महत्वाचे नेते उपस्थित असणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर प्रबोधनकार. डॉट. कॉम या वेबसाईटच्या रीलाँचिंगच्या निमित्तानं एकत्र आले होते. यावेळी दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले होते. त्यानंतर सुभाष देसाई आणि प्रकाश आंबडेकर यांच्यात चर्चेच्या दोन बैठका झाल्या होत्या.वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत युती करण्यासाठी होकार भरला. त्यानंतर आता उद्या युतीसाठी दोघांमध्ये पहिली अधिकृत बैठक होत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी