मराठा आरक्षण समिती 11 ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे.
ही समिती 11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मराठवाडा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. स्थानिक प्रशासने आतापर्यंत शोधलेल्या कुणबी नोंदीचा देखील आढावा घेतल्या जाण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन या समितीकडून करण्यात आले आहे. या दौऱ्या दरम्यान समितीचे अध्यक्ष व सदस्य छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत.