100 एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलकांना सभास्थळी मोठी गर्दी केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर आंदोलनाची पुढील दिशा 22 ऑक्टोबरला ठरवण्यात येणार आहे. मराठा आरक्षण नाही दिले तर पुढची जबाबदारी सरकारची आहे. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजययात्रा निघणार
तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत, या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, नाहीतर पुढचं 40 व्या दिवशी सांगू. माझा मराठा समाज शांततेत आला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत घरी जाणार. सरकारला देण्यात आलेल्या 40 दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. असे जरांगे पाटील म्हणाले.