मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेचे कौतुक केले. मात्र यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका देखील केली आहे.
राज्य सरकारने सध्या लाडकी बहिण योजना अमलात आणली ही योजना चांगली आहे. योजनेचे फॉर्म भरा पैसे ही घ्या कारण हे पैसे आपलेच आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नागपूरची जमीन किंवा प्लॉटिंग विकून आपल्याला पैसे दिले नाहीत.
लाडकी बहिण योजना आणली मात्र, लाडक्या भाच्याच्या आरक्षणाचे काय? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा गावात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तांदळा गावात मोठ्या जल्लोषात जरांगे पाटलांच स्वागत करण्यात आले.