मनोज जरांगे पाटील यांनी ही सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी राज्यातील 123 गावांनी आर्थिक मदत केलीय. तनमनधनाने गावकरी या सभेसाठी राबत आहेत. या सभेसाठी कालपासूनच लोक अंतरवली सराटीत दाखल झाले आहेत. सभेसाठी आलेल्या लोकांनी अख्खी रात्र जागून काढली आहे. आपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी हे लोक एकवटले आहेत. कुणबी असल्याचं सरसकट प्रमाणपत्र मिळावं हीच या सर्वांची मागणी आहे.
जालन्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली केंद्रप्रमुख तथा मुख्यध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.
रांगेंची सभा 100 एकर ग्राऊंडवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी 80 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये 110 रुग्णवाहिका, त्यात 35 कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच 40 बेडस, 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ असेल. 12000 लिटरचे 50 पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. 5 लाख पाणी बॉटल्स, 1000 लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे हे सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून दिवसाची सुरुवात करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत जरांगे आंदोलन स्थळी बसून राहणार आहेत. 11 वाजता ते सभास्थळावरून शक्ती प्रदर्शन करत उघड्या जीपमधून सभेच्या ठिकाणाकडे जाणार आहेत. सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रॅम्पवॉक करून मनोज जरांगे हे मंचावरती दाखल होतील. साधारणपणे एक तास भर ते भाषण करतील.