राजकारण

अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर रात्री उशिरापर्यंत महायुतीची बैठक

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका देखील होताना पाहायला मिळत असून अमित शाह हे मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर काल रात्री उशिरापर्यंत महायुतीची बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शाहांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

भाजप अंदाजे किती जागा लढवू शकते या विषयी दोघांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची चर्चा झाल्याची माहिती मिळत असून तब्बल दीड तासांहून अधिक काळ अमित शाह आणि फडणवीसांमध्ये चर्चा सुरु होती.

तसेच आगामी निवडणुकीला कोणत्या मुद्यांवर जोर द्यायचा तसेच योजना लोकांपर्यंत कशा पोहचवायच्या याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत असून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अमित शाहांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Tivsa Vidhansabha, Amravati : तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव ; कॉंग्रेसला मोठा धक्का

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महायुतीची पत्रकार परिषद सुरू

Amol Khatal win Sangamer Assembly Election Result 2024: बाळासाहेब थोरातांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; अमोल खताळ विजयी

Mahayuti PC LIVE: महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक दिवस: मुख्यमंत्री शिंदे

Zeeshan Siddiqui Bandra East Vidhansabha: झिशान सिद्दिकी यांचा वांद्रे पुर्व मतदारसंघात पराभव