mahavikas aghadi establishing success in getting the support of independent mlas team lokshahi
राजकारण

भाजपला पाठिंबा देणारे दोन अपक्ष महाविकास आघाडीच्या गोटात

अपक्ष आमदारांचं बळ मिळवण्यात महाविकास आघाडीला यश

Published by : Shubham Tate

mahavikas aghadi : राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. ट्रायडंट हॉटेलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत तीनही पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह लहान पक्ष आणि अपक्ष मिळून 165 आमदार उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना सरकारला पाठिंबा दिलेले समाजवादी पार्टीचे 2 आणि बहुजन विकास आगाडीचे 3 आमदार बैठकीला गैरहजर होते. तर त्यावेळी भाजपरोबर असलेल्या गीता जैन आणि विनोद अग्रवाल हे दोन अपक्ष महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. (mahavikas aghadi establishing success in getting the support of independent mlas)

राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळाल. ट्रायडंटवर मुख्यमंत्री, शरद पवारांच्या उपस्थिती बैठक पार पडली. बैठकीला मविआ, लहान पक्ष, अपक्ष मिळून 170 आमदार उपस्थित होते. सरकारला पाठिंबा दिलेले सपाचे 2, बविआचे 3 आमदार गैरहजर होते. भाजपला पाठिंबा देणारे दोन अपक्ष महाविकास आघाडीच्या गोटात पहायला मिळाल्याने सर्वांना आश्चर्यांचा धक्का बसला आहे.

महाविकासआघाडीला पाठिंबा असणाऱ्या 12 आमदारांची नावे

विनोद निकोले

नरेंद्र बोंडेकर

किशोर जोरगेवार

अशिष जयस्वाल

राजकुमार पटेल

विनोद अग्रवाल

संजय मामा शिंदे

गिता जैन

चंद्रकांत पाटील

शामसुंदर शिंगे

देवेंद्र भुयार

मंजुळा गावित

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय