Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

Video : एकनाथ शिंदे यांचा डोंबवलीत फोन, डॉक्टर त्यांची काळजी घ्या...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी डोंबवलीत फोन केला.

Published by : Team Lokshahi

अमजद खान| कल्याण

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे राज्यात नसले तरी त्यांचे संपुर्ण लक्ष शिवसैनिक व आपल्या कार्यकर्त्यांवर आहे. डोंबवलीमधील कार्यकर्ता रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी थेट डॉक्टरांना फोन केला.

डॉक्टर त्यांची काळजी घ्या...

डॉक्टर..मी एकनाथ शिंदे बोलतोय.. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा... माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती... हे संभाषण होत एकनाथ शिंदे यांचं डोंबिवलीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर बोलणे. डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ तारखेला अचानक बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू आहेत.आपल्या शिवसैनिकाची तब्बेत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली.

२३ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता शिंदेंनी डॉक्टरांना कॉल केला. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या, अशी विचारपूस शिंदे यांनी केली. महाराष्ट्रात एवढं मोठा राजकीय भूकंप झाला असून सरकार पडेल का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आपल्या राजकीय कामात गुंतले असतानाही शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची फोनवरून चौकशी केल्याबद्दल शिवसैनिकांनाही बरे वाटले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी