Devendra Fadnavis Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

भाजप- शिंदे गटात फार्मूला ठरला, 29 मंत्रीपदे भाजपकडे 13 बंडखोरांकडे

शिवसेनेचे बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी दिलासा मिळाला. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा त्यांच्या हालचाली सुरु आहेत.

Published by : Team Lokshahi

शिवसेनेचे बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी दिलासा मिळाला. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा त्यांच्या हालचाली सुरु आहेत. यासंदर्भात चर्चाही झाली आहे. शिंदे गटास उपमुख्यमंत्रीपदासह 13 मंत्रीपद तर भाजपकडे 29 मंत्रीपदे असे सूत्र ठरल्याचे वृत्त आज तकने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यास शिंदे गटातील 8 आमदारांना कॅबिनेट आणि 5 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 29 कॅबिनेट मंत्री भाजपचे असतील. बंडखोरीसोबत आलेल्या अपक्ष आमदारांना भाजपने त्यांच्या कोट्यातून मंत्री करावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.

बंडखोरांना हवी सध्याची खाती

शिंदे गटाकडे विद्यमान सरकारचे 8 मंत्री आहेत. अशा परिस्थितीत या आमदारांना जे मंत्रिपद आधीपासून होते तेच मंत्रीपद शिंदे गटाला हवे आहे. कारण गेल्या महिनाभरात घेतलेले त्यांचे महत्त्वाचे निर्णय उद्धव सरकारने रोखले आहेत. कालच या मंत्र्यांकडून खाती काढून घेतली आहे.

शिंदे गटाचे हे मंत्री होणार

एकनाथ शिंदे + दादा भुसे + गुलाबराव पाटील + संदिपान भुमरे + उदय सामंत + शंभूराज देसाई + अब्दुल सत्तार + राजेंद्र पाटील येडरावकर + बच्चू कडू (प्रहार)

हे नवीन मंत्री

दीपक केसरकर + प्रकाश आबिडकर + संजय रायमुलकर + संजय शिरसाठ यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

14 खासदारही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

महाराष्ट्रातील राजकारणाच्या युद्धात उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, शिवसेनेच्या एकूण 18 खासदारांपैकी 14 खासदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसे झाले तर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे यांचा दावा मजबूत होईल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी