Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होईल.
शिंदेंच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. अशा या एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. शिंदे यांच्या बंडखोरीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या तालमित घडलेले एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यासोबतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही एकनाथ शिंदेंचा मोठा सहभाग होता.
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द
1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार.
2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते.
12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता.
5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री. तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री.
ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते.
नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री.
ठाण्याच्या मातीत राजकिय कारकिर्दीची जडणघडण झालेले एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गाव सोडलं आणि ठाणे गाठले. ते तिथेच स्थायिक झाले. ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून अकरावीचं शिक्षण पूर्ण केले. अशातच आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.
आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आजचा आठवा दिवस आहे. 21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला रातोरात दाखल झाले. तेव्हा पासून गुवाहाटीच्या रिडेसन ब्लू हॉटेलात या आमदारांचा मुक्काम आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या समर्थनाची संख्या पुढे पुढे वाढत गेली. आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यापैकी 38 शिवसेना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. तर यात 9 अपक्ष आमदारही आहेत.